Home Breaking News पाटापांगरा येथे विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

पाटापांगरा येथे विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

7

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

पाटापांगरा येथे विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

घाटंजी- तालुक्यातील पाटापांगरा येथिल शेतकरी महादेव होळकर अंदाजे वय ४५ वर्ष व त्यांची पत्नी आज दिनांक १६ ऑक्टोंबर रोज शनिवारला दुपारी शेतात शेतीचे काम करीत होते. अश्यातच पावसाला सुरुवात झाली. यात आपल्या पत्नीस होळकर यांनी घरी जाण्यास सांगितले. यात त्यांची पत्नी काही अंतरावर जात नाही तोच विज कोसळली. तोच त्यांची पत्नी माघारी आली तर शेतकरी महादेव होळकर जागीच मरण पावल्याचे लक्षात येताच तिने गावाकडे धाव घेऊन गावकऱ्यांना घटनाक्रम सांगितले असता गावकऱ्यांनी घटनस्थळाकडे धाव घेतली. व त्यांना घाटंजी ग्रामीण रुग्णालयात हलविले. कुटुंबातील कमावते असलेले मृतक महादेव होळकर यांचेवर अचानक काळाने झडप घातल्यामुळे होळकर कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.

Copyright ©