Home Breaking News तुपटाकळी येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

तुपटाकळी येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

30

संपादक सदानंद जाधव

तुपटाकळी येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी शेत शिवारामध्ये दुपारी चार वाजता चे दरम्यान श्रीराम चंपत ढोरे यांचे शेतामध्ये झाडाखाली बांधून असलेल्या दोन बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज अंदाजे ४ वा घडली आहे .
श्रीराम ढोरे व त्यांचा मुलगा हे शेतकरी आपल्या शेतामध्ये बैल जोडी व गाय आणि वासरू झाडाखाली बांधून खाजगी कामासाठी पुसद येथे गेले असता आज १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान तुपटकळी शिवारात काही भागात विजेच्या गडगडतासह पाऊस झाला यादरम्यान झाडाखाली दोन बैल गाय व वासरू बांधून होते त्यात वीज पडल्याने दोन बैल जागीच ठार झाले तर गाय व वासरू काही अंतरावर असल्याने विजेचा किरकोळ फटका बसला असल्याची शेजारील शेतकऱयांकडून माहिती मिळाली आहे

Copyright ©