Home Breaking News मेटिखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार.

मेटिखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार.

8

——————————————-
कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी
——————————————-
परिसरातील रुग्णांची होतेय हाल.
——————————————-
कळंब- तालुक्यातील मेटिखेडा गाव परिसरातील मुख्य रस्त्यावर असल्याने शासन स्तरावरून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या परिसातील जनतेला या आरोग्य केंद्रा शिवाय पर्याय नाही. मात्र येथिल ढेपाळलेली आरोग्य सेवा व वरिष्ठ अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे येथिल कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
कोरोना आजारासोबतच ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया यासह साथ रोगाने डोके वर काढले आहे. यातच परिसरातील गोर गरीब जनतेच्या हाताला काम नाही हातात पैसा नाही. बिमार पडल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय पर्याय नसल्याने या आरोग्य केंद्रात उपचारासाठी रूग्ण दाखल होतात मात्र याठिकाणी कोणतेही डॉक्टर उपलब्ध राहत नाही. असेलच तर काही कारण सांगून दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मेटिखेडा गावासह परिसरातील रुग्णांची मोठे हाल होत असून आल्या पावली उपचाराविना परत जावे लागते. कधी रात्री बेरात्री प्रसूतिचे रुग्ण अथवा जास्त प्रकृती बिघडलेले रुग्ण या ठिकाणी आणल्यास या ठिकाणी कधीच जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्णा सह सोबतच्या नातेवाईकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या आरोग्य केंद्राला मोठा परिसर जोडला असला तरी गावोगावी नेमून दिलेले आरोग्यसेवक, सेविका, पर्व्यावेक्षक कोणत्याही गावाला भेटी देताना आढळत नाही. यात स्तंनदा माता, गरोदर स्त्रिया यांना वेळेवर जे लसीकरण व्हायला पाहिजे त्यापासून त्यांना वंचित रहावे लागते. येथिल अधिकारी व कर्मचारी गलेलठ्ठ पगार घेऊन जिल्ह्याच्या ठिकाण वरून कर्तव्य बजावित आहे. यात रुग्णांशी काहीही देणेघेणे नाही या आविर्भावात वावरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी याठिकाणी २४ तास आरोग्य सेवा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र या आरोग्य केंद्राकडे तालुका आरोग्य अधिकारी यांचे सह जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेच दुर्लक्ष असल्याने येथिल अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी वाढली असल्याने या भागातील लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी साहेबांनी येथिल विष्कळीत झालेली आरोग्य यंत्रणेवर लक्ष देवून परिसरातील रुग्णांना हक्काची आरोग्य सेवा पुरवावे अशी मागणी होत आहे. येथिल आरोग्य सेवा अशीच राहिली तर त्याविरोधात परिसरातील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे.

Copyright ©