Home Breaking News लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.

12

——————————————-
आरोपी सुरज कुमरे गजाआड
——————————————-
घाटंजी(तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील वासरी येथिल एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने दोन वर्षांपासून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या नराधमास घाटंजी पोलिसांनी गजाआड केले आहे.
आपल्याच गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवित आरोपी सूरज महादेव कुमरे वय २२ वर्ष रा. वासरी याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून सतत माझ्याशी संबंध ठेव असे दम भरीत होता. ही बाब अल्पवयीन मुलीच्या आईला माहीत होताच तिने घाटंजी पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार दिली.त्यावरून घाटंजी पोलिसांनी संशयित आरोपी सूरज कूमरे विरूद्ध भा. द. वी. कलम ३७६,३५४,३५४ अ,५०६(२) बाल लैंगिक संरक्षण कायदा२०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पी. एस.आय. विलास सिडाम जमादार सुनिल केवट यांचे सह घाटंजी पोलीस करीत आहे.

Copyright ©