येथील उडान पुलावर आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास डूमनी कुरा येथील 2 युवक व एक यवतमाळ येथील युवक मोटारसायकल ने आर्णी वरून यवतमाळ कडे MH 29 BA 1047 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने विरुद्ध दिशेने जात होते तितक्यात यवतमाळ वरून नांदेड कडे जाणारी MH 25 R 5730 या वाहनावर धडक दिल्याने मी मोटार सायकल वरील तीन युवक जाग्यावर ठार झाले आहे या अपघातात दीपक मेश्राम वय 35, वर्ष संदीप अत्राम वय 32 वर्ष दोन्ही राहणार कुरा डूमनी व नात्तू कुमरे 45 रा यवतमाळ असे मृतांचे नाव आहे व अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आर्णी येथील पोलिस उपनिरीक्षक नागेश जायले यांनी जाऊन सर्व मृतकांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठविले व पुढील तपास पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले करीत आहे.



