Home Breaking News जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला गँभीर, कुत्र्याचा जागीच मृत्यू,

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला गँभीर, कुत्र्याचा जागीच मृत्यू,

14

 

राळेगाव
तालुक्यातील जळका शिवारातील मझरा कॅनल वर जीवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला गभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज दी.23 घडली. या महिले सोबत शेतात जाणाऱ्या कुत्र्याचा मात्र विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या मुळे वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वसंता सायडू पवार यांचे मझरा कॅनल ला शेत लागून आहे. येथून रुकसा जमीना भोसले ही महिला तिच्या शेतात लावणी करीता जात होती. या ठिकाणी जीवंत विधुत पोल वरील तारेचा स्पर्श होऊन सोबतचा कुत्रा जागीच ठार झाला. तर सदर महिलेला विजेचा धक्का बसून ती गभीर जखमी झाली.या महिलेला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ ला पाठविण्यात आले. काल पासून कॅनल लगतच्या शेतात जीवंत वीज असणारे पोल पडून असणे ही गभीर बाब आहे. वीज वितरण च्या या गलथान कारभारा बाबत सर्वत्र संताप वेक्त होतं आहे.

Copyright ©