राळेगाव पोलीस टेशन अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येथील शिवा ऊर्फ जयंवत गोविंदा धानोरकर (३७) या युवकांने स्वतः च्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहुन दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली हि घटना १ वाजताच्या दरम्यान घडली असुन घरचे आई वडील बाहेर गेले होते तो घरी एकटाच होता गेल्या आठ दहा दिवसा पासुन आई वडिलांना मार झोड करने दारू पेऊन येऊन शिवीगाळ करने असा प्रकार नेहमीचाच होता आई वडिलांना एकुलता एक असुन घरी आठ एकर जमीन असुन मध्यवर्ती सहकारी बँक शाखा झाडगाव चे कर्ज आहे मात्र मृत्यू चे कारण काही समजुन शकले नाही तर अधिक तपास राळेगाव पोलीस टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे



