राळेगांव:
कर्ज बाजारीपणा, सततची नापिकी, शेतमालाला भाव कमी, आणि या वेळी कोरोण महामारीमुळे त्रासून गजानन अजाबराव डोमकावळे (५४) रा पिंपरी दुर्ग याने १८ मे २०२१रोज विषप्राशन करून आपली जीवनयात्र संपविली आहे.
एक हेक्टर कोरडवाहू शेती सहकारी संस्थेचे, खाजगी सावकाराचे अंदाजे दोन लाख रुपयांच्या वर कर्ज आहे. गजाननच्या मागे दोन अविवाहित मुली,मुलगा,पत्नी असा मोठा आप्तपरीवार आहे.



