आर्णी येथील वीरेंद्र जंगम वय 45 वर्ष हे 12 तारखेला दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेतीविषयक कामाकरिता कारेगाव अंजी ला गेले होते दरम्यान परत येताना त्यांच्या एम,एच,29 ए एस 2118 या मोटार सायकलला विठोली जवळ 7:30 च्या दरम्यान कोण्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वीरेंद्र जंगम यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला मृतकाला ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे शवविच्छेदनासाठी पाठविले असून आर्णी पोलीस त्या वाहनाच्या शोधात आहे



