आज दुपारी अवकाळी वादळी पाऊसासोबतच एच. पी. जिनींग जवळ वीज कोसळून युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सेवण शंकर पवार (15) असे मृतक युवकाचे नाव आहे. बकऱ्या चारत असतांना पाऊस आल्याने बकऱ्या घेऊन तो घरी आला. दरम्यान जेवणाचा डब्बा वडाच्या झाडाला टांगून राहून गेल्याने तो घेण्यासाठी तो परत गेला असता अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.सदर युवक शिवाजी नगर येथील रहिवासी असून त्याच्या पाठीमागे आई दोन भाऊ बहीण असा परिवार आहे. या युवकाच्या निधनाने तालुक्यात हळहळ वेक्त होतं आहे राळेगाव तालुक्यात काही भागात गुरुवार दुपारी पावसाने हजेरी लावली. राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात तही दुपार पासून संततधार पाऊस सुरु आहे.



