यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत नाकापार्डी येथील सचिन पांडुरंग सोनोने वय ३० याचाच शेजारी संतोष सोमाजी येसंसुरे वय ३१ याचे शी रात्री ९.४५ दरम्यान वाद सुरू झाला हा वाद इतका वीकोपास गेला की संतोष याचा राग अनावर झाला यांनी घरांमधून विळाआणला आणि सचिन याच्या डोक्यात मारला हा वार इतका जबर होता की तो विळा डोक्यात घुसून डोळ्यांमधून बाहेर निघाला व सचिन जमिनीवर कोसळला हि बाब घरच्याणा माहीत होताच त्याला वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले असुन त्यांचे वर उपचार सुरू आहे या घटनेची तक्रार नितीन पांडुरंग सोनोने यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली यावरून आरोपी विरूद्ध भा.द.वी. ३२६/३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार आहे या गुन्ह्याची चौकशी प्रेमशिंग राठोड हे करीत आहे



