आर्यवैश्य समाजातील
प्रतिष्ठित नागरिक,स्व.श्री.राजेश्वरराव बेलोरकर
ग्रा.वि.प्रतिष्ठाण चे संस्थाध्यक्ष, कृषीभुषन श्री.
सुधाकरराव बेलोरकर यांचे कनिष्ठ चिरंजीव
श्री.सुनिल सु, बेलोरकर यांची हृदयविकाराच्या
तीव्र झटक्याने प्राणजोत मालावली.सुनिलभाऊ
यांचा समाजातील विविध समाजसेवी संघटना
यांच्याशी त्यांचा फार जवळचा संबंध होता.
त्यांच्या हयातीत त्यांनी विविध संघटनांमध्ये
कार्य केले.
पानलोट क्षेत्राच्या माध्यमातून सुध्दा त्यांनी यवतमाळ जिल्हा व नांदेड जिल्ह्यात
शेती विकासाचे व पानलोटविकासाचे कार्य केले.मुळातच समाजसेवेची आवड असणारे
सुनिलभाऊ यांनी घाटंजी या त्यांच्या कार्यक्षेत्रा
त 1996 मध्ये समाजकल्याण मार्फत प्राथमिक
आश्रमशाळेची मुहूर्तमेढ रोवली, आज त्यांच्या
कडे प्राथमिक ,माध्यमिक, व उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून त्यामध्ये अनेक कर्मचारी
कार्यरत आहेत.या शाळेत अनेक विद्यार्थी
शिक्षण घेत असून काही विद्यार्थी येथूनच स्वतः
च्या पायावर उभी झाली तर काही विद्यार्थी
समाजत विविध क्षेत्रात कार्यरत असून काही
विद्यार्थी सरकारी सेवेत सेवा देत आहेत.
घाटंजीत ईस्तारी नगर येथे त्यांनी मातोश्री
विजयाताई बेलोरकर या इंग्रजी माध्यमाच्या
शाळेची निर्मिती केली असून आज तिथे 600
ते 700 विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
त्यानंतर त्यांनी यवतमाळ येथे सुध्दा इंग्रजी
माध्यमाची शाळा स्थापन केली.गेल्या दोन वर्षाच्या आधी त्यांनी ‘स्वदेश संघटन’ नावाच्या
संस्थेची स्थापना केली असून या संस्थेचा मूळ
उद्देश युवकांमध्ये देशप्रेम व देशसेवा ही भावणा
निर्माण व्हावी व युवा पिढी सूसंस्कृतीत व्हावी
हा होता.
विविध क्षेत्रात कार्य करण्याची आवड
असणारे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,
लहानांपासून ते सर्व मोठ्यांचा सन्मान करणारे
हे व्यक्तिमत्त्व काल दि.17/03/2021 रोजी
काळाच्या पडद्याआड गेले.
गेलेल्या माणसाची जागा व त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणीही
भरून काढू शकत नाही हे जरी त्रिकालबाधीत
असले तरी शास्वत सत्य आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, जेष्ठबंधू,
पत्नी,मुलगा,मुलगी,जावई, व फार मोठा मित्र
मित्रपरिवार असून या धक्यातून ईश्वर त्यांना
सावरण्याचे सामर्थ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना



