Home Breaking News *एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त* *दोन मृत्यु, 155...

*एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त* *दोन मृत्यु, 155 जण नव्याने पॉझेटिव्हz

9

एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त

 

दोन मृत्यु, 155 जण नव्याने पॉझेटिव्ह

 

यवतमाळ, दि. 3 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणा-यांची संख्या सुध्दा जास्त आहे. गत 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 215 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात दोन मृत्युसह 155 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळातील 74 वर्षीय आणि बाभुळगाव तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 155 जणांमध्ये 99 पुरुष आणि 56 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 45, पुसद 45, बाभुळगाव 15, दिग्रस 14, आर्णि 9, पांढरकवडा 7, नेर 6, मारेगाव 4, दारव्हा 3, कळंब 2, राळेगाव 2, उमरखेड 1, वणी 1 व इतर 1 रुग्ण आहे.

 

बुधवारी एकूण 942 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 155 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 787 जणांचे रिपोर्ट निगेटिव आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1741 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18241 झाली आहे. 24 तासात 215 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16031 आहे. तर जिल्ह्यात एकूण 469 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 166387 नमुने पाठविले असून यापैकी 165285 प्राप्त तर 1102 अप्राप्त आहेत. तसेच 147044 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

__________________&____

 

आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकासाठी

 

25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया

 

यवतमाळ, दि. 3 : शिक्षण हक्क अधिनियम 2009 तसेच महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम नुसार सन 2021-22 मध्ये आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकासाठी 25 टक्के राखीव जागावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. पालकांना http://student .maharashtra.gov.in/adm portal/users/rteindex या वेबसाईटवर दिनांक 3 मार्च 2021 ते 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 

ऑनलाईन अर्ज करतांना पालकांनी वरील वेबसाईटवर गुगल मॅपींग मध्ये स्वत:च्या घराचे स्थान अचूकपणे निश्चित करावे. यामध्ये घरापासून शाळेचे हवाई अंतर ग्राह्य धरण्यात येणार आहे. पालकांना घरापासून 1 कि.मी. व 3 कि.मी. हवाई अंतर परीसरातील 25 टक्के प्रवेश पात्र शाळांची यादी दिसेल. तसेच या शाळांमधील 25 टक्के प्रवेशाचा वर्ग व त्या वर्गातील 25 टक्के राखीव जागांची संख्या दिसून येईल. पालक त्यांना दिसणाऱ्या यादीमधील एक किंवा सर्वच शाळेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज भरतांना पालकांनी आपला मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावा. नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर निवड झालेल्या शाळेचे नाव, प्रवेशाचा कालावधी व इतर आवश्यक तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.

 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर संगणकीय प्रणालीमार्फत शाळानिहाय सोडत काढून प्रवेश निश्चित करण्यात येतील. निवड झालेल्या शाळेत प्रवेश न घेतल्यास त्या बालकास पुढील प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी केले जाणार नाही व त्याचा प्रवेश रद्द समजण्यात येईल. एकदा प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही शाळेत तो बदलून दिला जाणार नाही. पालकांनी अर्ज करतांना योग्य व अचूक माहिती भरावी. माहिती चुकीची भरली व त्याआधारे झालेला प्रवेश रद्द होऊन कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद सर्व संबंधीत पालकांनी घेणे आवश्यक आहे.

 

प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळेस पालकांचा उपविभागीय अधिकाऱ्याचा जातीचा दाखला (फक्त वंचित घटक), तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (फक्त दुर्बल घटक), सन 2019-20 किंवा 2020-21 उत्पन्नाचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. रहिवासाचा / निवासाचा पुरावा (वंचित व दुर्बल दोन्ही गटासाठी), आधारकार्ड / पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / विद्युतबिल / पाणी बिल / घरपट्टी / टेलीफोन बिल / ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाची नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. बालकाचा जन्मतारखेचा दाखला / पुरावा (वंचित व दुर्बल दोन्ही गटासाठी) ग्रामपंचायत, नगरपरिषद, रुग्णालय, अंगणवाडी, बालवाडी रजिस्टर मधील दाखला यापैकी एक. अपंगत्वाचा पुरावा – अपंग बालकासाठी 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 

तसेच तालुक्यात प्रत्येक शाळेकरीता विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची क्षेत्रीय अधिकारी नेमणूक करण्यात आलेली आहे. अंतिम मुदतीपूर्वी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.

 

_________________________

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत (इसापूर धरण) पाणी पाळ्याचे नियोजन

 

यवतमाळ, दि. 3 : उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील बिगर सिंचन आरक्षण व इतर व्यय वजा जाता सन 2020-21 मध्ये रब्बी हंगामात 3 पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळ्या देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगामात 3 पाणी पाळ्या देण्यात आल्या असून उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.

 

उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक खालीलप्रमाणे राहील. तथापी पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल. उन्हाळी हंगाम 2020-21 करीता पाणीपाळी क्र.1 ही 1 मार्च 2021 रोजी, पाणीपाळी क्र.2 ही 27 मार्च 2021 रोजी, पाणीपाळी क्र.3 ही 23 एप्रिल 2021, रोजी आणि पाणीपाळी क्र.4 ही 19 मे 2021 रोजी सोडण्यात येईल. त्यासाठी रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्यांचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापूर्वी संबंधीत शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.

 

काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधीत लाभधारकांची राहील. उडाप्याच्या / अंतीम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही.

 

पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसूली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

Copyright ©