Home Breaking News *शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन* , *परिसरात दहशतीचे वातावरण*

*शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन* , *परिसरात दहशतीचे वातावरण*

12

 

हिवरी

या परिसरात मागील दहा दिवसांपासून वाघाने कमालीची दहशत निर्माण केली असुन हिवरी मधील दोन गाईचा फडशा पाडला तर आज १० फेब्रुवारी ला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान विनोद गावंडे यांच्या शेतात अचानक पट्टेदार वाघ येथील काम करत असलेल्या मजुरास दिसल्याने पूर्णतः घाबरून नितीन गावंडे याला आपल्या मोबाईल वरुन वाघ असल्याची माहिती दिली तेव्हा गावातील अनेक युवकांनी पुढाकार घेत त्या परिसरात धाव घेतली व घाबरलेल्या रामजी अतकरी यास सुख रूप घरी आणले त्याला आणत असताना वाघाच्या ओरडण्याचा आवाज त्या परिसरात आलेल्या युवकांना ऐकायला येत होता या प्रकाराणी गावात कमालीची दहशत निर्माण झाली आहे वाघाची सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे तरी वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे अन्यथा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Copyright ©