हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत वाघाने मोठ्याप्रमाणात धुमाकूळ घातला असून आज कळपातील गाईवर हल्ला करीत राजू किसनराव येवले यांच्या मालकीची गाय वाघाने फस्त केल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही गाय 35 हजार रुपये किमतीची असल्याने राजू येवले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेष म्हणजे या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाघाची ये जा सुरू असल्याने हा वाघ अनेकांच्या दर्शनास आल्याने गुराख्यांनी व व वाहनधारकांनी सतर्क राहून रात्री-बेरात्री जंगलात कुणीही फिरकू नये असे आवाहनही वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी केले आहे याअगोदरही ही वाघांनी हल्ला करून मशीन फस्त केल्या होत्या तर एका गाईवर हि हल्ला करून फस्त केली होती याप्रकरणी वनविभागाने सतर्कता बाळगली असून ज्या ठिकाणी गाई वरील हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी सीसीटीव्ही ही कॅमेरेही ही लावण्यात आले आहे या ठिकाणी येणारा वाघ हा कोणत्या प्रजातीतील आहे याची माहिती घेण्याकरिता हे कॅमेरे लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांन कडून सांगण्यात आले



