Home Breaking News *ट्रॅक्टर दुचाकीच्या भीषण अपघातात -दुचाकीस्वार जागीच ठार*

*ट्रॅक्टर दुचाकीच्या भीषण अपघातात -दुचाकीस्वार जागीच ठार*

16

 

बोरी अरब/ यवतमाळ

आज सकाळी १०वाजताच्या दरम्यान हादगाव येथून दहिफळ मार्ग नेर जात असताना इंद्रठाण्या जवळ ट्रॅक्टरचा व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात हादगाव येथील अमोल राऊत (35) नेर येथे नेहमी प्रमाणे दुचाकीने जाताना यांचा व ट्रॅक्टरचा अपघात होऊन अमोलचा जागीच मृत्यू झाला यामुळे परिवारावराच नाही तर संपुर्ण गावावर शोककळा पसरली असून घरातील प्रमुख व्यक्ती असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच होती .त्याच्या पाठीमागे आई-वडील एक पत्नी एक मुलगा एक भाऊ तसेच दोन बहिणी असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे सर्व हातगावामध्ये शोककळा पसरली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास नेर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

Copyright ©