आज महाराष्ट्र शासनाने ओबीसी , एस सी एस टी मायनॉरिटी ची मेगा भरती विनाविलंब सूरू करावी अन्यथा खुर्ची खाली करावी ही मागणी घेऊन ओबीसी एससी एसटी मायनॉरिटी प्रवर्गा च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन दि.२४ जानेवारी दुपारी १२ वाजता महात्मा फुले पुतळा महात्मा फुले चौक आझाद मैदान यवतमाळ येथे करीत आहे.
त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्य़ात ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी फ्रंट ओबीसी जन मोर्चा तर्फे महात्मा फुले चौक जवळील आझाद मैदान मधे भव्य धरणे आंदोलन होत आहे.
सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्त्येनी ग्रस्त असलेल्या जिल्ह्यात बेरोजगारी च्या भस्मासुराने ओबीसी व समस्त मागासवर्गीय युवकांचेही भवितव्य ऊध्वस्त होत आहे . महाराष्ट्र शासनाचे लक्ष ह्या जिवनावश्यक मागणी कडे वेधण्यासाठी व बेरोजगार यूवकांना न्याय देण्यासाठी
ह्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने यूवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी फ्रंट ओबीसी जन मोर्चा व्हीजे एन टी एसबीआय बलुतेदार चे संघटन कच्छी मेमन जमात यवतमाळ ह्यानी केली आहे.
*जाहिर आवाहन*
*ओबीसी,एससी,एसटी,मायनॉरीटी या प्रवर्गाची मेगाभरती करण्यासाठी आयोजीत राज्यव्यापी आंदोलनात सहपरीवार सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे



