Home Breaking News *माजी आमदार राजु तोडसाम यांना तिन महिन्याचा कारावास*

*माजी आमदार राजु तोडसाम यांना तिन महिन्याचा कारावास*

9

 

 

सागर मुडे 9822147144

 

 

यवतमाळ / पांढरकवडा :-

२०१३ साली महावितरण कार्यालय पांढरकवडा येथिल लेखा पालास अश्लील शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी कानिष्ठ न्यायालयाने २०१५ साली माजी आमदार राजू तोडसांम यांना सूनावलेली ३ महिने कारावासाची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडा ने कायम केल्याने तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.

१७/१२/२०१३ ला काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी राजु तोडसाम आपल्या समर्थका सह विज वितरण कार्यालयात गेले होते तेथील लेखापाल विलास आकोट यांचेशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादवी २९४,३५२,३५३,५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता कानिष्ठ न्यायालयात सदर प्रकरणी १० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या व दिनांक २७/११/२०१५ ला राजु तोडसाम यांना कलम २९४ मध्ये ३ महिने साधा कारावास आणि १० हजार रु दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिने कारावास तर कलम ३५२ मध्ये ३ महिने साधा कारावास आणि ५०० रु दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस अधिक चा कारावास सुनावला होता हि शिक्षा सुनावली तेव्हा राजू तोडसाम आर्णी विधानसभा आमदार होते.

या प्रकरणी तत्कालीन आमदार राजू तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात शिक्षे विरोधात अपिल दाखल केले होते या प्रकरणी ३ वर्षांनी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पि. बि. नाईकवाड यांनी कानिष्ठ न्यायालय पांढरकवडा चा आदेश कायम ठेवला.

आदेश येताच माजी आमदार स्वतःहून पोलीस स्टेशन ला आल्याने पांढरकवडा पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करीत राजु तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी केली.

या वेळी शासना तर्फे सरकारी वकील आर.डी. मोरे यांनी तर राजु तोडसाम यांचे तर्फे ऍड.गणेश धात्रक यांनी काम पाहिले तर संतोष राऊत हे पैरवी अधिकारी म्हणून उपस्थित होते.

उद्या आपण नागपुर उच्च न्यायालयात या शिक्षे विरोधात धाव घेणार असल्याचे माजी आमदार राजु तोडसाम यांनी सांगितले.

सदर शिक्षे मुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Copyright ©